सलाम !!!
रक्तात जयाच्या धैर्य अन शस्त्र जयाच्या हाती,तो देशासाठी जगतो मरतो तो देशासाठी...
झाले कितीक हुतात्मे, कितीच हो बलिदानी,
रंगल्या कितीक वीरश्री, इतिहासाच्या पानोपानी...
तेजस्वी परंपरेची धुरा घेऊनी हाती,
तो देशासाठी जगतो मरतो तो देशासाठी...
संपन्न मायभू ही समरांगण जेव्हा होते,
शत्रुत्वाच्या आघाताने, असहाय ती विव्हळते,
मातीतही मिसळून जाई, करी शत्रूचीही माती,
तो देशासाठी जगतो मरतो तो देशासाठी...
अजुनी कातरवेळी जीव आईचा तीळतीळ तुटतो,
चिंतेने व्याकुळ नेत्री, अश्रुंचा पाझर फुटतो,
अर्पिते बाळ स्वतःचा ती मात्रुभूमीच्यासाठी,
तो देशासाठी जगतो मरतो तो देशासाठी...
गावे किती हे पवाडे, तव शौर्य कसे वर्णावे,
तुमच्या अतुल ॠणाला उतराई कैसे व्हावे,
नतमस्तक आम्ही होतो, हा ’सलाम’ तुमच्यासाठी,
तो देशासाठी जगतो मरतो तो देशासाठी...

khup mhanje khup mast
ReplyDelete