
सूर्य जसा मावळतो, दूर नदीच्या काठी,
आठविती मग मजला त्या नदीकाठच्या भेटी...
डोळ्यात आजही जपतो, स्वप्न तुझ्यासम रंगविलेले,
आळवितो आजही सूर तुझ्या संगतीत गवसलेले...
नसलीस जरी तू जगी या, हे गाणॆ तुझेच ओठी,
आठविती मग मजला त्या नदीकाठच्या भेटी...
वाजता कुणाचे पैंजण, उमटता तो मंजूळ नाद,
घुटमळते कानी माझ्या, तुझीच प्रेमळ साद,
क्षणार्धात का विरली जन्मोजन्मीची नाती,
आठविती मग मजला त्या नदीकाठच्या भेटी...
स्वप्नांच्या गावी अजुनी असते तुझीच चाहूल,
तुझ्याच दिशेला आजही आभास वळवितो पाऊल,
का क्षणोक्षणीचे झुरणॆ, केवळ एका भेटीसाठी,
आठविती मग मजला त्या नदीकाठच्या भेटी...

स्वप्नांच्या गावी अजुनी असते तुझीच चाहूल,
ReplyDeleteतुझ्याच दिशेला आजही आभास वळवितो पाऊल,
ya 2 oli khuuuuupppp avadalya
सुपर ..
ReplyDeleteभन्नाट कविता.. खूप खूप आवडली यार..
का क्षणोक्षणीचे झुरणॆ, केवळ एका भेटीसाठी
-- ही लाईन तर वेड आहे..वेड..
जीवघेणी..
holo kajala tula
ReplyDelete